sharad pawar
sharad pawar

बारसू रिफायनरीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया म्हणाले, प्रकल्प महत्त्वाचा असेल तर...

कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरु आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरु आहे. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, बारसूत आता फक्त जमिनीची मोजणी सुरू असं सामंत यांनी सांगितलं. मी बारसूला जाणार नाही. पण माझ्या पक्षाचे काही सहकारी तिथे जात आहे. काही गेले आहेत. एखादा प्रकल्प राज्यात कोणी करत असेल, प्रकल्प महत्त्वाचा असेल तर लोकांना विश्वासात घ्या. त्यांचा विरोध काय आहे हे समजून त्यातून मार्ग काढा, असा सल्ला मी दिला आहे. असे शरद पवार म्हणाले

यासोबतच ते पुढे म्हणाले की, रिफायनरीतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं ही शेवटची स्टेप असते. ती स्टेज आलेली नाही. त्यावर चर्चाही झाली नाही. चर्चेतून तोडगा निघाला नाही तर या चर्चेत जे मुद्दे आले त्यावरून आपण काही पर्याय काढू असे शरद पवार म्हणाले.

sharad pawar
मोदींना पत्र देणारेच आंदोलन पेटवत आहेत - उदय सामंत
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com