Nashik Bus Fire Team Lokshahi
ताज्या बातम्या
नाशिक-पुणे महामार्गावर चालत्या बसने घेतला पेट
नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर चालत्या बसला आग लागली आहे.
महेश महाले : नाशिक | नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर चालत्या बसला आग लागली आहे. शिवनेरी गाडीने भररस्त्यात अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेताच सर्व प्रवाशी त्वरित गाडीबाहेर पडले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
ही बस नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या जात होती. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत, मात्र क्षणार्धात बसने घेतल्याने बसचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात वाहनांनी अचानक पेट घेतल्याच्या अनेक घटना सध्या समोर येत आहेत.