Sudhir Suri
Sudhir SuriTeam Lokshahi

शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या घालून हत्या

शिवसेना टकसालीचे नेते सुधीर सूरी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. सूरी हे गोपाल मंदिराच्या बाहेर धरणे आंदोलन करत होते.

अमृतसरमधून शिवसेनेसाठी मोठी बातमी समोर येत आहे. अमृतसरचे शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात गंभीर जखमी होते त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

एका मंदिरासमोर निदर्शन करत असताना एका अज्ञात व्यक्तीने येऊन त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांची गोळीबार केला आहे. पोलिसांनी गोळी झाडणाऱ्याला अटक केली असून त्यासंबंधी आरोपीनी कबुली दिली आहे.

गोपाळ मंदिराबाहेरील कचऱ्यात देवांच्या मूर्ती सापडल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नेते सुधीर सुरी हे मंदिराबाहेर आंदोलन करत होते. या दरम्यान गर्दीतून कोणीतरी त्याच्यावर गोळी झाडली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com