उद्धव ठाकरेंच्या अहमदनगर दौऱ्यावरून श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंच्या अहमदनगर दौऱ्यावरून श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून जोरदार टीका केली आहे.
Published by  :
shweta walge

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी काल अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या गावांना भेटी दिल्या. यावरच मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उध्दव ठाकरे बांधावर जाऊन नाटक करत आहेत. त्यांनी हे आधी केल असत तर बरं झालं असतं आता नाटक करून काहीही फायदा नाही. असं ते म्हणाले आहेत.

सर्वात जास्त मदत शेतकऱ्यांना आमच्या सरकारने केली आहे. याआधी अडीच वर्षे यांचं सरकार होत तेव्हा स्वतःला घरामध्ये बंद करून घेतलं. जेव्हा हे सरकार आलं तेव्हा सर्व निकष बाजूला सारून शेतकऱ्यांना मदत केली. केंद्राच्या निधीत आणखी भर घालून मदत दिली. शेतकऱ्यांना जे जे लागेल ते आमच्या सरकारने दिलं फक्त घोषणा आश्वासन आम्ही देत बसलो नाही. जे जातायत दाखवण्यासाठी हे अगोदर करायला पाहिजे होतं. आता भेटायलाजायचं नाटक करायचं हे नाटक आता शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राला देखील समजलं आहे, असा घणाघात श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

काल उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी कोपरगावच्या काकडी गावात ठाकरेंनी शेतीचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे व्यथा मांडल्या. त्यानंतर संगमनेरच्या वडझरी गावात शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.दरम्यान उद्या ते जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव येथील मानराज पार्क येथे दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वचनपूर्ती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंच्या अहमदनगर दौऱ्यावरून श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल
'पक्षामध्ये कोणतीही फूट नाही', शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com