Shrikant Shinde On Operation Sindoor : 'आपरेशन सिंदूरनंतर देशाचा संदेश जगापर्यंत पोहोचवण्याची मोठी संधी मिळाली'; खासदार श्रीकांत शिंदेंचे प्रतिपादन

भारताच्या या शौर्याची कहाणी जगभरात सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही खासदारांची निवड केली. त्यात श्रीकांत शिंदे आणि मिलिंद देवरा यांचाही समावेश होता.
Published by :
Rashmi Mane

शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन आज, 19 जून 2025 रोजी साजरा होत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे दोन वेगवेगळे वर्धापन दिन मेळावे आज पार पडणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाबेह ठाकरे गट) यांच्या पक्षाचा वर्धापन दिन किंग्ज सर्कल येथील श्री षण्मुखानंद सभागृहात पार पडत असून शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या पक्षाचा वर्धापन दिन वरळीतील एनएससीआय डोम येथे पार पडत आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, दीपक केसरकर, संजय शिरसाट, उदय सामंत, रविंद्र वायकर, गजानन किर्तीकर, निलम गोर्हे, प्रकाश आबिटकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांसह इतर शिवसेनेचे मान्यवर उपस्थित आहेत.

यावेळी पत्रकार उदय निरगुडकर यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांची मुलाखत घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मिशन राबवले. यामध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळं उद्धवस्त केली. भारताच्या या शौर्याची कहाणी जगभरात सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही खासदारांची निवड केली. त्यात श्रीकांत शिंदे आणि मिलिंद देवरा यांचाही समावेश होता. त्यांच्या याच अनुभवाबाबत मुलाखतीमध्ये माहिती देण्यात आली.

हेही वाचा

Shrikant Shinde On Operation Sindoor : 'आपरेशन सिंदूरनंतर देशाचा संदेश जगापर्यंत पोहोचवण्याची मोठी संधी मिळाली'; खासदार श्रीकांत शिंदेंचे प्रतिपादन
Eknath Shinde On ShivSena 59th Vardhapan Din : 'हा वर्धापन दिन अस्सल शिवसेनेचा, दुसरा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com