अजित पवार गटाचे कार्यकर्ते कुटुंबियांचा अविभाज्य घटक; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीत बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. बंडानंतर तब्बल 52 दिवसांनी सुप्रिया सुळे आपल्या मतदार संघात पोहचल्या आहेत. या दरम्यान अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिसून आल्याने अनेक चर्चाना उधाण आलं आहे. या प्रकरणी सुप्रिया यांना विचारले असता त्यांनी हे कार्यकर्ते नसून पवार कुटुंबियांचा अविभाज्य घटक आहेत, असे सुळे म्हणाल्या आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बारामती जिल्हा माझं माहेर आणि कर्मभूमी आहे. येथील लोक माझ्या बरोबर आहेत. माझं समाजकारण आहे. मी पक्षाकडे फक्त तिकीट मागितले आहे. मी एक सेवक म्हणून लोकांनी मला संधी दिली. दिल्लीत संसदेत बारामतीची आण बाण शान पहिल्या नंबरला राहिल.
राष्ट्रवादीत विचारांचे अंतर निर्माण झालं आहे. यांच्यात पवार कुटुंबियांचा काही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार कुटुंब नाही. हा एक कौटुंबिक विषय नाही. आमच्यातल्या काही घटकाला असं वाटत की वेगळ्या विचारांच्या घटकसोबत त्यांनी जावे आणि काहींचे म्हणणं वेगळं आहे. हे वैयक्तिक मतभेद नाहीत तर वैचारिक आहे. यात गैर काही नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज अंतर दिसत आहेत. पुढे काही होईल मी सांगू शकत नाही हे वैचारिक मतभेद आहेत मन भेद नाही. अजित पवार रोज महाराष्ट्रच्या दौऱ्यावर असतात ते लवकरच बारामतीत येतील असं देखिल त्या म्हणाल्या आहेत.