नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा खिंडार; नरेश म्हस्केंचं सूचक ट्विट

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा खिंडार; नरेश म्हस्केंचं सूचक ट्विट

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडले आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडले आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अनेक कार्यकर्ते हे ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत शिंदे गटात प्रवेश केला आहे.आज पुन्हा एकदा नाशिकमधील ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.

आज ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी संजय राऊत यांचा हा दौरा आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जातो. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी एक ट्विच केलं आहे.

नरेश मस्के यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आज पुन्हा एकदा उडणार आहे भडका सपक झालेल्या डाळीला दिलाय आम्ही तडका सकाळच्या भोंग्याला पुन्हा एक चपराक बसेल खरे मावळे कुठे आहेत सगळ्या जगाला दिसेल बाळासाहेबांच्या नावावर राष्ट्रवादीचे दुकान चालवले म्हणून खरे शिवसैनिक एकेक करून सोडून चालले ' असे मस्के यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा खिंडार; नरेश म्हस्केंचं सूचक ट्विट
योगी हे भगव्या वस्त्रातील सत्पुरुष असून त्यांच्यात एक राजकारणी दडलाय; सामनातून भाष्य
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com