Sanjay Raut On Babanrao Lonikar : 'महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी, ; लाचार नाही' संजय राऊतांचे वक्तव्य

भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर लोणीकर यांनी भाषणातून आगपाखड केली आहे.
Published by :
Riddhi Vanne

भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर लोणीकर यांनी भाषणातून आगपाखड केली आहे. कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचे लिहितात. याच कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केला आहे असे वक्तव्य लोणीकर यांनी केले. तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत असेही लोणीकर म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत म्हणाले की, "पहलगाम येथे 26 माय भगिनींच कुंकू पुसलं तेही मोंदीमुळे पुसलं, हे सुद्धा सांगितले असते, तर सत्याला किनारा मिळाला असता, या राज्यांची जनता स्वाभिमानी आहे, ती लाचार नाही. हे बबन लोणीकरांना समजायला पाहिजे. भाजपचे लोक महाराष्ट्रातील लोकांना लाचार समजतात' मोंदीच्या चरणाचे दास समजतात." असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com