Ola Electric Showrooms : ओला कंपनीची  90 टक्के दुकानं होणार बंद; नोंदणी नसलेली वाहनं ठेवल्यामुळे राज्य सरकारची कारवाई

Ola Electric Showrooms : ओला कंपनीची 90 टक्के दुकानं होणार बंद; नोंदणी नसलेली वाहनं ठेवल्यामुळे राज्य सरकारची कारवाई

नोंदणी नसलेली वाहने ठेवण्याची परवानगी नसल्यामुळे महाराष्ट्रातील ओला इलेक्ट्रिकच्या 450 शोरूमपैकी जवळपास 90 टक्के बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

नोंदणी नसलेली वाहने ठेवण्याची परवानगी नसल्यामुळे महाराष्ट्रातील आरटीओच्या आदेशानुसार ओला इलेक्ट्रिकच्या 450 शोरूमपैकी जवळपास 90 टक्के बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे आता ओलाच्या 450 शोरूमपैकी जवळपास 405 शोरूम बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामधील ओला कंपनीचे अस्तित्व सध्या धोक्यात आहे.

राज्यात ओला कंपनीची जवळपास 90 टक्के दुकाने (शोरूम) बंद होण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातील आरटीओने (प्रादेशिक परिवहन कार्यालय) या शोरूमची तपासणी केली असता बरीच शोरूमकडे ट्रेड सर्टिफिकेट (व्यापार प्रमाणपत्र) नसताना सुद्धा ते शोरूम्स सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे शोरूम ट्रेड सर्टिफिकेटशिवाय सुरू असून, ती तत्काळ बंद करण्याच्या सूचना आरटीओने केल्या आहेत. गेल्या महिन्यात आरटीओने यासंदर्भात धडक कारवाई करत महाराष्ट्रातील अनेक ओला स्टोअर्सवर छापे टाकले होते. दुकानांमध्ये व्यापार प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना आरटीओने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. इतकेच नाही तर ओला कंपनीला (Ola Electric) यापूर्वीही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.

सोशल मीडियामध्ये अनेक युजर्सनी ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या त्रुटींबद्दल तक्रारीसुद्धा केल्या आहेत. आता आरटीओच्या या आदेशामुळे इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमधील ओलाच्या विक्रीवर त्याचा जबरदस्त नकारात्मक परिणाम होऊन विक्रीमध्ये घट येणार आहे. शोरूममध्ये नोंदणी नसलेली वाहने ठेवण्यासाठी आणि विकण्यासाठी ट्रेड सर्टिफिकेट (व्यापार प्रमाणपत्र) असणे अनिवार्य असते. मात्र ओला कंपनीकडे असे ट्रेड सर्टिफिकेट नसल्यामुळे त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. तसेच सर्व्हिस सेंटरचा अभाव आणि नोंदणीतील अडथळा यामुळे ग्राहकांची संख्या तर कमी झालीच आहे. मात्र आता ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स सुद्धा 6 महिन्यांत 34 टक्केपेक्षा जास्त घसरले आहेत. या सर्व अडचणींमुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. सध्या कंपनीचा तोटा 428 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरातील ओला स्टोअर्सवर आरटीओने कारवाई केली असून आतापर्यंत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 32 दुकानांवर छापे टाकण्यात आले आहेत. याशिवाय राजस्थानमधील काही दुकानांवरही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनेसुद्धा जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा

Ola Electric Showrooms : ओला कंपनीची  90 टक्के दुकानं होणार बंद; नोंदणी नसलेली वाहनं ठेवल्यामुळे राज्य सरकारची कारवाई
Food In Shravan : श्रावण महिन्यात 'हे' पदार्थ खाणं टाळा; आरोग्य राहील उत्तम
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com