Devendra Fadnavis
Devendra FadnavisTeam Lokshahi

ज्यांनी काहीच केलं नाही ते आमच्याकडे बोट दाखवत आहेत : देवेंद्र फडणवीस

‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. तसेच राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. महाराष्ट्रातील मोठा प्रोजेक्ट वेदांत हा गुजरातला पळवल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आक्रमक झाली आहे,
Published by :
shweta walge

‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. तसेच राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. महाराष्ट्रातील मोठा प्रोजेक्ट वेदांत हा गुजरातला पळवल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आक्रमक झाली आहे, विरोधी पक्ष शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. याचं पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दावे खोडून काढत महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडल्याची खंत व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुजरातच्या अर्थव्यवस्थेत जामनगर रिफायनरी आणि मुद्रा पोर्टचा मोठा वाटा मोठा आहे. मात्र आपल्याकडे रिफायनरीलाच विरोध करण्यात आला. मी अनिल अग्रवाल यांच्याशी बोललो होतो. गुजरातपेक्षा चांगलं पॅकेज करतो म्हटलं. त्यावर ते म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रात नक्कीच गुंतवणूक करू, पण आता आमचा निर्णय़ झालेला आहे.

दरम्यान अनिल अग्रवाल यांचा निर्णय़ आमचं सरकार येण्याच्या आधीच झाला होता. आम्ही आल्यानंतर आम्ही खूप प्रयत्न केला. मात्र ज्यांनी काहीच केलं नाही ते आमच्याकडे बोट दाखवत आहेत. तुमच कर्तृत्व काय आहे, हे सांगा, असा सावल करत, महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला आहे. मात्र पुढील दोन वर्षात महाराष्ट्राला निश्चित पुढे नेणार, असं फडणवीस म्हणाले.

सर्व जिल्ह्यांच्या अडचणी मी सोडवणारच आहे. भारताला ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था करायचं असेल तर महाराष्ट्र वन ट्रिलियन करावाच लागले. महाराष्ट्र वन ट्रिलियन झाल्याशिवाय भारत ५ ट्रिलियन होणार नाही. त्यासाठी एकत्रितपणे टीम म्हणून काम करावं लागेल. ते करण्याची पूर्ण मानसिकता आमची असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.

Devendra Fadnavis
आदित्यला काय कळतं..., 'कोण ओळखतं त्याला? - नारायण राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com