Washim
Washim Team Lokshahi

मृत्यूनंतरही मरणयातना कायम, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीच्या वाहत्या पाण्यातून प्रवास

स्मशानभूमी आणि पुलासाठी ग्रामस्थांकडून वेळोवेळी मागणी
Published by :
Sagar Pradhan

गोपाल व्यास, वाशिम : मरणानंतर ही मृतकला सोसाव्या लागत आहेत यातना, होय अशीच परिस्थितीच धगधगत वास्तव वाशिमच्या कोंडोलीत समोर आली आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कोंडोली येथील हा धक्कादायक प्रकार व्हिडिओतून समोर आला आहे. नदीतील पाण्याच्या धोकादायक प्रवाहातून अंत्ययात्रा व नंतर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. रस्ता आणि स्मशानभूमीची परिस्थिती खूप वाईट असल्याने धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्मशानभूमी आणि पुलाची मागणी ग्रामस्थांकडून वेळोवेळी करण्यात आली. मात्र, ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासन यांचा हलगर्जीपणा आज समोर आला आहे.

Washim
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष- बावनकुळे

ग्रामीण भागात सोयी सुविधांचा असलेला अभाव आणि त्यांचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे. रस्ता पूल आणि स्मशानभूमी बरोबर नसल्याने मृतदेह नदीच्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून कुटुंबीय घेऊन जात असतानाचा हृदयाला हेलावणारा व्हिडिओ वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कोंडोली येथून समोर आला आहे. गुडघाभर पाण्यातून आणि वाहत्या प्रवाहातून वाट काढत मृतदेह नेण्याची वेळ आली आहे. एवढच नाही तर स्मशानभूमी वरील पत्र पूर्णपणे फुटले असल्याने अंत्यसंस्कार करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहे.

Washim
जयंत पाटलांना भेटू न दिल्यानं, कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

कोंडोली येथील रामगोपाल बियाणी हे वयोवृद्ध असलेले नागरीकाचा मृत्यू झाला. परंतु, त्या गावात स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने अंत्यसंस्कारासाठी गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. मात्र या पाड्यात स्मशानभूमी गावापासून खूप अंतर आहे. नदी पार करून जावं लागतं असल्याने आणि नेहमीच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मृतदेह नेण्यासाठी रस्ता पूल नसल्याने नदीच्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून हा मृतदेह दुसऱ्या बाजूला नेला जातो. त्यामुळे नागरिकांतून प्रशासानाच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान जिल्ह्यात अशा अनेक गंभीर घटना घडत असून प्रशासन या सर्व बाबींकडे लक्ष देईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com