Wardha accident
Wardha accident team lokshahi

वर्ध्यात ट्रक-कारच भीषण अपघात, 5 भाविक गंभीर जखमी

जखमींना केलं नागपूर सेवाग्राम रूग्णालयात दाखल
Published by :
Shubham Tate
Published on

वर्धा (भूपेश बारंगे) :- वर्ध्यातील हिंगणघाट उमरेड मार्गावरील धोंडगाव जवळील वळणावर अनियंत्रित होऊन, रस्त्याच्या कडेला घुसलेल्या ट्रकवर चंद्रपुरवरुन गिरड येथील बाबा फरीद दर्गा टेकडीवर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कार ट्रकला धडकली. या भीषण अपघातात कार मधील ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Truck-car accident in Wardha, 5 devotees seriously injured)

Wardha accident
Trending : 20 वर्षांपासून येत होते पीरियड्स, या पुरुषाला गुप्तांगसह होते अंडाशय

अपघाताची माहिती मिळताच गिरड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कार बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवले. माहितीनुसार दुपारच्या सुमारास उमरेड कोळसा घेऊन जात असलेला ट्रक क्रमांक.एम एच ३४ बि. जी.९२८६.हा धोडगाव जवळील वळणावर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला घुसला, याच वेळी चंद्रपुर जिल्ह्यातील भाविक आपल्या हुंडाई कार क्रमांक एच. एम. ०१ एव्ही ७०६६ गिरड बाबा फरीद दर्गा टेकडीवर दर्शनासाठी येणाऱ्या कार चालकाचे कारवरुन नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन ट्रकला धडकली.

Wardha accident
आजपासून खुलणार 'या' लोकांचे नशीब, मकर राशीत शनीचे संक्रमण करिअरमध्ये मिळणार झेप

या भीषण अपघातात कारचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला होता. कार चालक तेजस्वी नामदेव घायवान (वय २४ वर्ष), उदय सुरेश बागडे वय (१७ वर्ष), अतुल नामदेव घायवान वय (२९ वर्ष), सर्व राहणार राहणार राळेगाव तालुक भद्रावती जिल्हा चंद्रपूर आमीन हुसेन पठाण (वय २५ वर्ष) ,हमिद शेख राहणार दोन्ही वरोरा गंभीर जखमी झाले, या अपघाताची माहिती मिळताच गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल दहिभाते यांनी पोलिस कर्मचारी राहुल मानकर, कृष्णा गुरले सह गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाठवून सर्व जखमींना उपचारासाठी गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले.

येथे प्राथमिक उपचारानंतर सर्वांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. यातील तेजस्वी नामदेव घायवान व आमीन हुसेन पठाण या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यांना नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद गिरड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com