पाकिस्तानचे शेपूट वाकडेच! तुर्कीला मदत घेऊन जाणारे भारतीय विमान अडवले

पाकिस्तानचे शेपूट वाकडेच! तुर्कीला मदत घेऊन जाणारे भारतीय विमान अडवले

तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. यामध्ये 4000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
Published on

नवी दिल्ली : तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. यामध्ये 4000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेक बेपत्ता आहेत. तुर्कीमधील भूकंपग्रस्तांसाठी भारताने तात्काळ मदत जाहीर करुन सामग्री विमाने रवाना केली. परंतु, भारतीय एनडीआरएफ विमानाला पाकिस्तानने हवाई हद्द नाकारली आहे. त्यानंतर विमानाला मोठा वळसा घालावा लागला. यामुळे सर्वच स्तरातून पाकिस्तानवर टीका करण्यात येत आहे.

भारतीय एनडीआरएफची टीम आधुनिक ड्रिलिंग उपकरणे, वैद्य आणि बचाव दलातील कुत्र्यांसह तुर्कीच्या अदानी विमानतळावर आधीच उतरल्या आहेत. मात्र, पाकिस्तानने त्यांना हवाई हद्द देण्यास नकार दिल्याने त्यांना यादरम्यान अडचणीचा सामना करावा लागला. त्यानंतर विमानाला बरेच अंतर कापावे लागले. तुर्कीीत आपात्कालीन स्थितीत पाकिस्तानने हवाई हद्द न देणे हे अत्यंत लाजिरवाणे कृत्य मानले जात आहे. तर, तुर्कीचे राजदूत फिरात सुनेल यांनी मदत पाठवल्याबद्दल भारताचे आभार मानले आणि गरज असताना कामी येणारा मित्रच हा खरा मित्र असतो, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तान उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. भारताने विमानाने लोकांना अन्नधान्य पाठवले होते. त्यावेळीही पाकिस्तानने हवाई हद्द देण्यास नकार दिला होता. मात्र नंतर मानवतावादी आधारावर परवानगी देण्यात आली. नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळीही पाकिस्तानने असेच केले होते. त्यानंतर विमानाला बराच वेळ वळसा घालून अमेरिकेला जावे लागले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com