Uddhav Thackeray, Ravi Rana
Uddhav Thackeray, Ravi RanaTeam Lokshahi

"उद्धव ठाकरे यांनी चुल्लू भर पाण्यात डुबून मरायला पाहिजे" आमदार रवी राणांची जीभ घसरली

राहुल गांधी व उद्धव ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा आमदार रवी राणा यांची मागणी

सुरज दहाट, अमरावती : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले मात्र अमरावती जिल्ह्यातील आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडलं, तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रवी राणा यांची जीभ घसरली आहे.

रवी राणा म्हणाले की, राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समर्थन केल आहे, म्हणून उद्धव ठाकरे यांनी चुल्लू भर पाण्यात डुबून मरायला पाहिजे असं वादग्रस्त विधान रवी राणा यांनी केले आहे. तसेच देश विरोधी वक्तव्य करणारे राहुल गांधी व त्यांना समर्थन देणारे उद्धव ठाकरे या दोघांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा मी आंदोलन करेल असा इशारा रवी राणा यांनी दिला आहे.

Uddhav Thackeray, Ravi Rana
तुमच्या आज्जीने सावरकरांचं पत्र वाचलं नव्हतं का? आनंद दवेंचा राहुल गांधींना सवाल

तसेच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी देशाचे माफी मागावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याच समर्थन केलेलं नाही तरी देखील सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करून चर्चेत राहण्यासाठी आमदार रवी राणांनी वक्तव्य केलं अशा चर्चा रंगू लागल्या आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com