ताज्या बातम्या
Raj - Uddhav Reunion? : 'जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तेच होईल'; उद्धव ठाकरेंनी मनसे युतीबाबत केले सूचक विधान
उद्धव ठाकरे यांनीही मनसे-सेना युतीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.
राज्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच काल मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी दोघ भावांच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली असताना आज, शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनीही मनसे-सेना युतीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असताना त्यांना मनसेसोबतच्या युतीवर विचारण्यात आले. यावर, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे असेल, तेच होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर सकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.