'तरुण आणि महिलांनी मोठ्या संख्येने मतदान करावे', मतदानापूर्वी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे आवाहन
Admin

'तरुण आणि महिलांनी मोठ्या संख्येने मतदान करावे', मतदानापूर्वी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे आवाहन

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांतील 93 विधानसभा जागांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. त्याचवेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाम हे देखील आज मतदान करणार आहेत. मतदान प्रक्रियेचा भाग होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या जनतेला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

पीएम मोदींनी ट्विट करून म्हटलं की, आज दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व लोकांनी, विशेषतः तरुण मतदार आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे माझे आवाहन आहे. सकाळी ९ वाजता अहमदाबादमध्ये मतदानासाठी जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट करून जनतेला मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अमित शहा यांनी ट्विट केले की, गुजरातमध्ये आज मतदानाचा दुसरा आणि शेवटचा टप्पा आहे. मी या टप्प्यातील सर्व मतदारांना, विशेषत: तरुणांना आवाहन करतो की, गुजरातमध्ये शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करणारे सरकार प्रचंड बहुमताने निवडण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे. तुमच्या एका मतात गुजरातचे सोनेरी भवितव्य आहे. अमित शहा नारणपूर येथील महापालिकेच्या कार्यालयात उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com