Pune: गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. मध्यभागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ मंगळवारी सकाळी 10:30 च्या सुमारास होणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यरात्रीनंतर शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.
मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मध्यभागातील हे रस्ते बंद राहणार!
1. लक्ष्मी रस्ता
2. छत्रपती शिवाजी रस्ता
3. टिळक रस्ता
4. शास्त्री रस्ता
5. केळकर रस्ता
6. बाजीराव रस्ता
7. कुमठेकर रस्ता
8. जंगली महाराज रस्ता
9. कर्वे रस्ता
10. भांडारकर रस्ता
11. पुणे-सातारा रस्ता
12. सोलापूर रस्ता
13. प्रभात रस्ता
14. बगाडे रस्ता गुरू नानक
15. फर्ग्युसन रस्ता
16. गणेश रस्ता
या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहणार आहे.