Coconut water Benefits
Coconut water BenefitsTeam Lokshahi

Coconut water Benefits : नारळ पाणी पिण्याचे 'हे' आहेत आर्श्चयकारक फायदे

नारळामध्ये 94 टक्के पाणी असते
Published by :
shamal ghanekar

पावसाळा सुरु झाला असून त्याचा जोर कमी असल्याने जास्त उन्हाळा जाणवतो. अशा वेळी शरीराला हायड्रेटेड ठेवणं फार महत्त्वाच आहे. तसेच नारळामध्ये 94 टक्के पाणी असते, जे शरीराला पूर्णपणे हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. उन्हाळ्यामध्ये खूपजण नारळ पाणी (Coconut water) पितात. नारळ पाणी जेवढे चवीला गोड असते तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर असते. नारळाच्या पाण्यात आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. तर चला जाणून घेऊया नारळ पाणी पिण्याचे फायदे.

Coconut water Benefits
Benefits Of Carrots : गाजराचे 'हे' आर्श्चयकारक फायदे तुम्हाला माहितीयेत का?

नारळ पाणी पिण्याचे फायदे :

नारळात सुमारे 600 मिलीग्राम पोटॅशियम आढळते. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही मजबूत ठेवण्यासाठी नारळाचे पाणी प्यायले जाते.

सकाळी व्यायाम केल्यानंतर तुम्ही नारळ पाणी प्यायल्याने ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. नारळ्याच्या पाण्यामध्ये कॅलरीज (Calorie) कमी प्रमाणात असल्यामुळे हे पाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते ज्यामुळे सतत लागणारी भूक कमी होते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते

डिहायड्रेशनमुळे (Dehydration) अनेकदा डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होत असतो. अशा वेळी नारळ पाणी प्यायल्याने ते शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरुन काढण्यासाठी मदत करते.

नारळाचे पाणी जेवढे आरोग्यासाठी गुणकारी असते तेवढेच ते त्वचेसाठीही गुणकारी असते. ते त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते. तुम्ही ते चेहऱ्यावर लावले तर चेहऱ्यावरील मुरुम दूर होण्यास मदत होते.

ज्या व्यक्तींना सतत डोकेदुखीचा त्रास जाणवतो त्यांनी नियमित नारळ पाणी पिल्यास त्यांची या त्रासापासून सुटका होण्यास मदत होते.

हाय ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित नारळ पाणी पिल्याने ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. नारळामध्ये आढळणारे व्हिटामिन सी, पोटॅशियम हे घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या (‎Blood Pressure) अनेक व्यक्तींनी दररोज नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरते.

Coconut water Benefits
Benefits of coriander leaves : कोथींबीर सेवन केल्याने होतात 'हे' फायदे
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com