महाराष्ट्रात 'कशी' साजरी केली जाते दहीहंडी; जाणून घ्या काय आहे परंपरा

महाराष्ट्रात 'कशी' साजरी केली जाते दहीहंडी; जाणून घ्या काय आहे परंपरा

कोरोनाने राज्यात अगदी धुमाकूळ घातला होता. आता कोरोनाच्या दोन वर्षानंतर दहीहंडी हा उत्सव मोठा उत्साहात साजरा होणार आहे. अगदी लहाण्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण या उत्सहाचा आनंद घेतात. श्रावणातील महत्वाचा सण म्हणजे गोपाळकाळा - दहीहंडी.
Published by :
Siddhi Naringrekar

कोरोनाने राज्यात अगदी धुमाकूळ घातला होता. आता कोरोनाच्या दोन वर्षानंतर दहीहंडी हा उत्सव मोठा उत्साहात साजरा होणार आहे. अगदी लहाण्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण या उत्सहाचा आनंद घेतात. श्रावणातील महत्वाचा सण म्हणजे गोपाळकाळा - दहीहंडी. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंचावर टांगले जाते. हंडी फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात.

गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके सर्वजण दहीहंडी फोडतात. ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण आणि आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला आणि सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी एका सजवलेल्या मडक्यात काला करून ते दोरीच्या सहाय्याने उंचावर बांधण्याची आणि मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. जास्तीत जास्त उंचीवर जाऊन हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस दिले जाते.

गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. काला म्हणजे पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू आणि आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक पदार्थ. हे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्री जागरण करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा. जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करावी. बाळकृष्णाला नैवेद्य अर्पण करावा. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात गोपाळकाल्याच्या निमीत्ताने दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या परंपरेने जन्माष्टमी साजरी केली जाते.

महाराष्ट्रात 'कशी' साजरी केली जाते दहीहंडी; जाणून घ्या काय आहे परंपरा
ढाकुम्माकुम! दहीहंडीची धूम, यंदा नऊ थरांचा विक्रम मोडणार?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com