Apple benefits
Apple benefits Team Lokshahi

सकाळी रिकाम्यापोटी सफरचंद खाण्याचे जाणून घ्या फायदे...

सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाण्यासाठी डॉक्टर नेहमी सल्ले देतात
Published by :
Published on

Apple benefits : सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाण्यासाठी डॉक्टर नेहमी सल्ले देतात. कारण सफरचंदात लोह, प्रोटीन, जीवनसत्त्वे आढळतात. याशिवाय सफरचंदात कार्बोहायड्रेट्सही आढळतात. सकाळी सफरचंद खाल्ल्याने शरीरात दिवसभर एनर्जी राहते. रोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने तुमच्या आरोग्यासाठी कोणते फायदे होतात. चला तर जाणून घेऊया. (Know the benefits of eating an apple on an empty stomach in the morning)

1. पोषक तत्वे - सफरचंद फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे समृध्द असतात. सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास सफरचंदात असलेले हे सर्व पोषक तत्व शरीर सहजपणे शोषून घेते. शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते. मध्यम आकाराच्या सफरचंदात पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी देखील असते.

Apple benefits
भाजप विरोधात बोलणाऱ्यांवर चुकीची कारवाई, शरद पवारांचा भाजपवर घणाघात


2. प्रतिकारशक्ती- विविध रोगांशी लढण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करणे आवश्यक आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. सफरचंदात व्हिटॅमिन सी, प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

3. हृदय - रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने हृदयही निरोगी राहते. सफरचंदात असलेले फायबर रक्तदाब नियंत्रित ठेवते. याशिवाय सफरचंदात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम देखील असते. हे घटक हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करतात.

Apple benefits
सिटी को ऑपरेटिव्ह बॅंक पुनरुज्जीवन योजनेसाठी धनवर्षा समूहाचा पुढाकार, 230 कोटींची गुंतवणूक करणार

4. वजन- जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सफरचंदाचे सेवन करू शकता. रोज सकाळी एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही तुमचे वजन कमी करण्यात यशस्वी होऊ शकता. सफरचंदात फायबरचे प्रमाण जास्त असते. हे खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. जर तुम्ही जास्त खाणे टाळले तर तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागते.

5. जळजळ- सफरचंद नेहमी सालीसोबत खावे. रिकाम्या पोटी सफरचंद सालीसह खाल्ल्याने शरीरातील सूज दूर होते. सफरचंदाच्या सालीमध्ये फ्लेव्होनॉइड क्वेर्सेटिन असते जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com