Ashadi Ekadashi 2022
Ashadi Ekadashi 2022Team Lokshahi

Ashadi Ekadashi 2022 : जाणून घ्या आषाढी एकादशीचे महत्व

महाराष्ट्रमध्ये 'आषाढी एकादशी'ला विशेष महत्त्व आहे.
Published by :
shweta walge
Published on

महाराष्ट्रमध्ये 'आषाढी एकादशी'ला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूर वारीला जाण्याची परंपरा फार जुनी असून भक्तांची श्रद्धा या वारीशी जुळलेली आहे. दरवर्षी वारकरी पायी पंढपूरला जातात. यंदा आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) रविवारी 10 जुलै 2022 रोजी आहे.

आषाढी एकादशी उपवासाचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. एकादशीचा उपवास करणाऱ्याला धनाची प्राप्ती होते, अशी आस्था आहे. आषाढी एकादशीचे उपवास केल्याने मानसिक शांती लाभते आणि शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळते. वर्षभरात येणाऱ्या एकादश्यांमध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादश्या महत्त्वाच्या मानल्या जातात.

Ashadi Ekadashi 2022
Ashadhi Ekadashi Wari 2022 : माऊलीच्या जयघोषात चिंब झाला संदीप

समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली. यात विविध जातीपातीचे लोक सहभागी होतं. यास 'पंढरीची वारी' असं म्हटलं जाते. यात सामिल होणारे सगळे 'वारकरी' असतात. आषाढी एकादशी निमित्त ठिकठिकाणांहून पालख्या घेऊन वारकरी विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाला जातात. सगळे भेदभाव विसरुन वारकरी वारीत सामिल होतात. आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेऊन वारीची सांगता होते. आषाढी एकादशी महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन जातो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com