Bakul Kavthekar
Bakul KavthekarTeam Lokshahi

धरिला पंढरीचा चोर गाण्यातील हा “विठोबा” आठवला? १८ वर्षांपूर्वी आधीच…

१९८८ साली प्रदर्शित झालेल्या “पंढरीची वारी” या चित्रपटामुळे थेटर हाऊसफुल झाले होते.
Published by :
shweta walge
Published on

१९८८ साली प्रदर्शित झालेल्या “पंढरीची वारी” या (Pandharichi Vari) चित्रपटामुळे थेटर हाऊसफुल झाले होते. आजही हा चित्रपट आणि त्यातील धरिला पंढरीचा चोर हे गाण तितक्याच आपुलकीने आणि आत्मीयतेने पाहिला आणि ऐकले जाते. जयश्री गडकर, बाळ धुरी, नंदिनी, राघवेंद्र काडकोळ, राजा गोसावी, अशोक सराफ (विरोधी भूमिका) अशा अनेक नामवंत कलाकारांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या.

चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाटगे यांची असून याचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन रमाकांत कवठेकर यांनी केले होते. चित्रपटात पंढरीच्या वारीला जाताना जयश्री गडकर यांच्या कुटुंबाला वाटेतच एक चिमुकला भेटतो आणि येणाऱ्या अडचणींना दूर करत तो या कुटुंबाचे रक्षण करतो. चित्रपटात हा चिमुकला मुका दर्शवला असल्यामुळे कुठलाही संवाद न साधताच तो आपल्या निरागस अभिनयाने साऱ्यांची मने कशी जिंकून घेतो याचे हे सुंदर कथानक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडले आहे.

साक्षात विठोबाचे रूप साकारणारा हा चिमुकला चित्रपटाच्या शेवटच्या क्षणी साऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आणण्यास भाग पाडतो असे हे सुंदर कथानक या सर्वच जाणत्या कलाकारांनी आपापल्या भूमिकेतून अतिशय सुरेखपणे दर्शवलेले पाहायला मिळाले.

“बकुल कवठेकर” (Bakul Kavthekar) हा बालकलाकार याच चित्रपटाचे दिवंगत दिग्दर्शक रमाकांत कवठेकर (Ramakant Kavthekar) यांचा मुलगा आहे. या चित्रपटानंतर मात्र बकुल फारसा कोणत्या चित्रपटात पाहायला मिळाला नाही. पुढे बकुलने पुण्यातील भारती विद्यापीठातून फाईन आर्टस् चे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळवला. मात्र आपले शिक्षण पूर्ण करत असतानाच २००२ साली बकुलचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.


Bakul Kavthekar
Ashadi Ekadashi 2022 : जाणून घ्या आषाढी एकादशीचे महत्व

“बकुल कवठेकर” ह्या बालकलाकाराने ह्या चित्रपटात जे उत्कृष्ट काम केले आहे ते आजही पाहताना पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com