वसुबारसनिमित्त प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा

वसुबारसनिमित्त प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा

दिवाळीची पहिली पणती 9 नोव्हेंबर रोजी गाय वासरांसाठी लावली जाणार आहे. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी.
Published on

Vasubaras 2023 : दिवाळीची पहिली पणती 9 नोव्हेंबर रोजी गाय वासरांसाठी लावली जाणार आहे. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. या सणाचा आनंद वाढवण्यासाठी आपल्या प्रियजनांना सोशल मीडियावरुन विशेष शुभेच्छा द्या. 

वसुबारसनिमित्त प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा
Diwali 2023 : तुमच्या प्रियजनांची 'या' शुभेच्छांनी दिवाळी करा खास

गाय आणि वासराच्या अंगी असणारी

वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी

हे सर्व आपणास लाभो....

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

वसुबारस या शब्दातील वसू

म्हणजे धन त्यासाठी

असलेली बारस म्हणजे द्वादशी

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला,

स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..

परमपुज्य जी वंद्य या भारताला,

नमस्कार त्या दिव्य गो देवतेला..

वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा..!

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची

वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची

दिवाळीचा पहिला दिवस

वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...

आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com