क्रिस्पी आणि सुपर हेल्दी नाश्तासाठी ट्राय करा  कॉर्न आलू टिक्की

क्रिस्पी आणि सुपर हेल्दी नाश्तासाठी ट्राय करा कॉर्न आलू टिक्की

लोक कॉर्न वेगवेगळ्या प्रकारे वापरतात. जर तुम्हाला कॉर्नसोबत काही चविष्ट पदार्थ करून पहायचे असतील, तर तुम्ही कॉर्न आलू टिक्की तयार करू शकता.

Corn and Aloo Tikki : कॉर्नमध्ये भरपूर खनिजे, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. फायबर समृद्ध असल्याने, कॉर्न पाचन आरोग्य सुधारण्यास मदत करते आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते. याशिवाय शुगर लेव्हल नियंत्रित करण्यात आणि वजन कमी करण्यातही मदत होऊ शकते. लोक कॉर्न वेगवेगळ्या प्रकारे वापरतात. जर तुम्हाला कॉर्नसोबत काही चविष्ट पदार्थ करून पहायचे असतील, तर तुम्ही कॉर्न आलू टिक्की तयार करू शकता.

क्रिस्पी आणि सुपर हेल्दी नाश्तासाठी ट्राय करा  कॉर्न आलू टिक्की
बाप्पाचे आवडते मोदक खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' फायदे; जाणून घ्या

साहित्य

3/4 कप उकडलेले, मिक्सरमध्ये बारिक केलेलं कॉर्न

2 चमचे चिरलेली कोथिंबीर

२ हिरवी मिरची

चिमूटभर मीठ

1/2 कप उकडलेले, मॅश केलेले बटाटे

2 चमचे लिंबाचा रस

१/२ टीस्पून गरम मसाला पावडर

१/२ कप रिफाइंड तेल

कृती

ही सोपी स्नॅक रेसिपी बनवण्यासाठी एका खोलगट भांड्यात कॉर्न, बटाटे, कोथिंबीर, लिंबाचा रस, हिरवी मिरची, गरम मसाला आणि मीठ एकत्र करा. सर्वकाही चांगले मिसळा. या मिश्रणाचे 8 समान भाग करा आणि प्रत्येक भागाला लहान टिक्कीचा आकार द्या. आता एका नॉन-स्टिक पॅनवर तेल गरम रून त्यावर टिक्की ठेवा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत शिजवा. हिरवी चटणी आणि टोमॅटो केचपसोबत गरमागरम सर्व्ह करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com