अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहे.
आशिष शेलार यांनी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या 'चित्रांगण' सभागृहाचे उद्घाटन केले आणि मराठी चित्रपट क्षेत्रातील विविध घटकांसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्याची घोषणा केली.