छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदावरून हटवावे, या मागणीसाठी राज्यातील खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
बेळगाव सीमाभागातील हिरेबागवाडी टोलनाक्यावर काल (6 डिसेंबर) महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या सहा ट्रकची तोडफोड कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे.
कर्नाटक सरकार महाराष्ट्राला डिवचण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. काल जत तालुक्यात पाणी सोडल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे.