यावर्षी देशभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे, यंदा देशासह राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता, पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहिलं. अनेक राज्यांना पुराचा मोठा फटका बसला,
आज पाऊस मागील काही दिवसांपेक्षा सावरला असून हलक्या वाऱ्यासह सुरु आहे. दरम्यान महाराष्ट्रानंतर आता पावसाचे वारे 'या' राज्यात सरकल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
पुढील पाच दिवस कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज गडचिरोली आणि उद्या चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.