राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ओळख पडताळणी (KYC) करणे बंधनकारक केले आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर योजनेचा पुढील आर्थिक लाभ मिळणार नाही.
2024 च्या ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य सरकारने मध्यप्रदेशच्या धरतीवर राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. मात्र या योजनेमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.
सरकारने सर्व लाभार्थींना e-KYC करणे बंधनकारक केले असून या प्रक्रियेसाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. पण, याच दरम्यान गुगलवर काही फसवे वेबसाईट्स दिसू लागले आहेत, जे वापरणाऱ्यांचे बँक खाते रिकामे ...