India vs South Africa
India vs South Africa

IND vs SA 3rd ODI : उद्या इंडियासाठी 'करो या मरो', विशाखापट्टणमच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेसोबत रंगणार सामना

India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील वनडे सीरीज निर्णायक टप्प्यावर आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील तीन सामन्यांच्या वनडे सीरीजमध्ये रोमांचक वळण आले आहे. दोन्ही टीम्स सध्या मालिकेत 1-1 बरोबरीत आहेत, त्यामुळे तिसरा सामना निर्णायक ठरेल. या महत्त्वाच्या सामन्याचे आयोजन विशाखापट्टणमच्या डॉ. वाई.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए स्टेडिअममध्ये होणार आहे. टीम इंडिया या सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीज जिंकण्याचा प्रयत्न करेल.

दक्षिण आफ्रिकेची टीम 10 वर्षांनंतर भारतात वनडे सीरीज जिंकण्यासाठी मैदानात उतरते आहे. विशाखापट्टणमच्या या मैदानाने भारतीय संघाला नेहमीच साथ दिली आहे. येथे खेळलेल्या 10 वनडे सामन्यांपैकी भारताने 7 मॅचेस जिंकल्या आहेत, फक्त 2 मॅचेस पराभवाचे झाले आहेत आणि एक सामना टाय झाला आहे. म्हणजेच या मैदानावर भारतीय संघाची विजय टक्केवारी 70% च्या आसपास आहे.


India vs South Africa
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा 359 धावांचा विक्रमी पाठलाग; भारताचा 4 विकेट्सने पराभव, मालिकेत बरोबरी

टीम इंडियाने येथे शेवटचा वनडे सामना 2019 मध्ये जिंकला होता, मात्र 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाला हा भाग्यवान मैदान लाभला आणि त्यांनी भारताला हरवले होते. आता दोन वर्षानंतर भारत पुन्हा एकदा या मैदानावर जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेसह उतरतोय.


India vs South Africa
IND vs SA 2nd ODI : ऋतुराज-विराटची दमदार शतके, भारताचे रायपुरमध्ये दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचे लक्ष्य!

दक्षिण आफ्रिकेला या मैदानाचा खेळण्याचा पूर्वानुभव नाही. ते येथे अजून एकही वनडे सामना खेळलेले नाहीत. 2019 मध्ये येथे एक टेस्ट आणि 2022 मध्ये एक टी20 सामना त्यांनी खेळल्या, ज्यात दोन्ही वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा विजयाचा रेकॉर्ड अजूनही शून्य आहे. म्हणूनच, दक्षिण आफ्रिकेला ही सीरीज जिंकण्यासाठी या मैदानावर आपला इतिहास बदलावा लागेल आणि विजयाचं खातं उघडावं लागेल. या निर्णायक सामन्याला क्रिकेटप्रेमी मोठ्या उत्सुकतेने पहात आहेत, कारण हा सामना पुढील काळातील दोन्ही संघांचे भविष्य ठरवू शकतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com