RCB BUY 8 PLAYERS IN MINI AUCTION, FULL LIST AND AMOUNT SPENT
RCB Team In IPL 2026

IPL Auction 2026 : मिनी लिलावात RCBचा मोठा डाव! 8 खेळाडूंवर उधळले कोट्यवधी, जाणून घ्या

RCB Team In IPL 2026: आयपीएल २०२६ मिनी लिलावात आरसीबीने १६.४० कोटी रुपये खर्चून ८ खेळाडू खरेदी केले.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

आयपीएल २०२६ साठी झालेल्या मिनी लिलावापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) कडे १६.६५ कोटी रुपयांचा पर्स होता. गतवर्षी जेतेपद मिळवलेल्या या संघात कोणते बदल होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रिटेन्शनद्वारे १७ खेळाडूंना कायम ठेवत संघ मजबूत केला असला तरी, खरेदीसाठी ८ जागा शिल्लक होत्या. मिनी लिलावात १६.४० कोटी रुपयांच्या खर्चाने आरसीबीने ८ खेळाडू खरेदी करत आपला संघ आणखी शक्तिशाली केला आहे.

RCB BUY 8 PLAYERS IN MINI AUCTION, FULL LIST AND AMOUNT SPENT
IPL 2026 Auction : IPL 2026 ची रणधुमाळी सुरू! आज रंगणार खेळाडूंचा लिलाव, कोणावर लागणार सर्वात मोठी बोली?

आरसीबीने ६ भारतीय आणि २ विदेशी खेळाडूंना संघात सामावले. यात सर्वाधिक बोली वेंकटेश अय्यरवर लावली गेली. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या या अष्टपैलूला ७ कोटी रुपयांना आरसीबीने आपल्या घरी आणले. मध्य प्रदेशचा अष्टपैलू मंगेश यादव याला ५.२० कोटी रुपयांना खरेदी केले. तसेच, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफीला २ कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर संघात सामावले. मेगा लिलावात वेंकटेशसाठी आरसीबीने बोली लावली होती, पण केकेआरने मोठी रक्कम देऊन त्याला रोखले होते. रिलीजनंतर आरसीबीने पुन्हा फिल्डिंग लावली आणि यश मिळवले.

RCB BUY 8 PLAYERS IN MINI AUCTION, FULL LIST AND AMOUNT SPENT
IPL 2026 Auction : मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज सौदा! रोहित शर्मासोबत नवा गेमचेंजर, कोट्यवधींची डील

आरसीबीने खरेदी केलेले 8 खेळाडू

  • वेंकटेश अय्यर – 7 कोटी रुपये

  • मंगेश यादव – 5.20 कोटी रुपये

  • जेकब डफी – 2 कोटी रुपये

  • जॉर्डन कॉक्स – 75 लाख रुपये

  • विकी ओस्तवाल – 30 लाख रुपये

  • विहान मल्होत्रा ​​- 30 लाख रुपये

  • सात्विक देसवाल – 30 लाख रुपये

  • कनिष्क चौहान – 30 लाख रुपये

आता आरसीबीच्या पर्समध्ये फक्त २५ लाख रुपये शिल्लक आहेत. यापूर्वी स्वस्तिक चिकारा, मयंक अग्रवाल, टिम सेफर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, मनोज भागे, लुंगी एनगिडी, ब्लेसिंग मुजारबानी आणि मोहित राठी या खेळाडूंना रिलीज करण्यात आले होते. आयपीएल २०२६ साठी ट्रेडिंगद्वारे कोणत्याही खेळाडूचा समावेश केला नाही. मागील पर्वात १८ वर्षांत प्रथमच जेतेपद जिंकणाऱ्या आरसीबीसमोर आता सलग दोन वेळा विजेतेपद राखण्याचे मोठे आव्हान आहे. हे यश मिळेल की निराशा पडेल, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

RCB BUY 8 PLAYERS IN MINI AUCTION, FULL LIST AND AMOUNT SPENT
Maharashtra Politics: संपूर्ण मुंबईत लागले फलक; मराठी माणसांकडून फलकबाजी, मनसेचा दावा
Summary
  • आरसीबीने मिनी लिलावात ८ खेळाडूंची खरेदी केली

  • वेंकटेश अय्यरवर ७ कोटींची सर्वाधिक बोली

  • एकूण ६ भारतीय व २ विदेशी खेळाडू संघात दाखल

  • लिलावानंतर आरसीबीकडे फक्त २५ लाख रुपये शिल्लक

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com