Smriti Mandhana and Palash Muchhal getting married
Wedding Update

Smriti Mandhna And Palash Muchhal: पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना ७ डिसेंबरला लग्न करणार? व्हायरल पोस्टमागील नेमकं सत्य काय?

Smriti Mandhna And Palash Muchhal Wedding Update: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल ७ डिसेंबरला लग्न करणार अशी बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

भारताची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाची उत्सुकता चाहत्यांमध्ये खूप पाहायला मिळते. लग्न निश्चित तारखेला पुढे ढकलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सांगली येथे लग्नाच्या विधी सुरू झाल्या होत्या. पण लग्नाच्या दिवशीच त्यांच्या लग्नाचा समारंभ पुढे ढकलण्यात आला. स्मृतीचे वडील अचानक आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यामुळे लग्नाचा कार्यक्रम रद्द करावा लागला.​ आता ७ डिसेंबर रोजी स्मृती आणि पलाशचे लग्न निश्चित होईल का? याबाबत स्मृतीच्या भावाने उत्तर दिले आहे.

Smriti Mandhana and Palash Muchhal getting married
Palash Muchhal and Mary Dcosata: पलाश मुच्छल आणि मेरी डिकॉस्टाचं अफेअर? ‘व्हायरल चॅट’मुळे सोशल मीडियावर चर्चेचा भडका, नेमकं प्रकरण काय?

सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की, लग्न पुढे ढकलण्यात आल्यानंतर स्मृती आणि पलाश ७ डिसेंबर रोजी लग्न करणार आहेत. या लग्नामध्ये पलाश आणि स्मृती यांचे फक्त जवळचे मित्र सामील होतील अशी माहिती पसरत आहे. मात्र, स्मृतीच्या भावाने या बातम्या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, “मला या अफवांबद्दल काहीही माहिती नाही. सध्या तरी लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. पलाश, स्मृती किंवा त्यांच्या कुटुंबियांनी अद्याप लग्नाची तारीख निश्चित केलेली नाही.

Smriti Mandhana and Palash Muchhal getting married
WTC 2025: WTC पॉइंट्स टेबलमध्ये भारताचा क्रम पाकिस्तानच्या खाली, दक्षिण आफ्रिकेचा क्लीन स्वीपही टॉप रँक मिळवू शकला नाही

लग्नाच्या अगदी आधी, स्मृतीचे वडील आजारी पडले आणि त्यानंतर पलाश देखील आजारी पडला. यामुळे लग्न स्थगित करावे लागले. तथापि, सोशल मीडियावर असा दावा केला जातो की, पलाशवर कोरिओग्राफरसोबत फ्लर्टिंग केल्याचा आरोप आहे. यामुळे असा अंदाज बांधला जात होता की, लग्नाच्या एक दिवस आधी स्मृतीने पलाशला रंगेहाथ पकडले होते, म्हणूनच लग्न पुढे ढकलण्यात आले.​

स्मृती आणि पलाश यांचे लग्न मूळतः २३ नोव्हेंबर रोजी होणार होते. त्यांच्या लग्नाच्या विधी सुरू झाल्या होत्या, पण लग्न स्थगित करण्यात आले. आता, लग्न कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या चाहत्यांना लग्नाच्या नवीन तारखेची उत्सुकता आहे.

Summary
  • सोशल मीडियावर पसरलेल्या ७ डिसेंबरच्या लग्नाच्या बातम्या खोट्या असल्याचे कुटुंबाचे स्पष्टीकरण.

  • लग्नाची नवीन तारीख अद्याप निश्चित नाही.

  • काही व्हायरल आरोपांना कुटुंबीयांनी अफवा ठरवले असून लग्न पुढे ढकलण्याचे मुख्य कारण आरोग्य समस्या असल्याचे सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com