OnePlus 10T 5G
OnePlus 10T 5Gteam lokshahi

OnePlus 10T 5G लाँच, 19 मिनिटांत होईल चार्ज, सेलमध्ये ऑफर

ICICI बँक आणि SBI कार्डवर ऑफर
Published by :
Team Lokshahi

OnePlus 10T 5G : चिनी स्मार्टफोन निर्माता वनप्लसने भारतासह जागतिक बाजारपेठेत आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 10T लॉन्च केला आहे. OnePlus 10T हा ब्रँडचा सर्वात शक्तिशाली हँडसेट आहे, ज्यामध्ये तुम्हाला Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळतो. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, 4800mAh बॅटरी आली आहे, जी 150W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. (oneplus 10t 5g price in india launch specifications)

OnePlus 10T 5G
Baby Diet : सहा महिन्यांनंतर या गोष्टी बाळांना खायला द्या, म्हणजे बाळ राहील निरोगी

फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. फोन नवीन असला तरी OnePlus 10 Pro सारखाच आहे. हँडसेट 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज ऑफर करतो.

OnePlus 10T ची किंमत

OnePlus चा हा फोन 49,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. ही किंमत फोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. त्याचा 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 54,999 रुपयांमध्ये येतो.

OnePlus 10T 5G
उद्धव ठाकरेंकडे हाच शेवटचा पर्याय? 'तेजस' अस्त्र?

टॉप व्हेरिएंटची किंमत 55,999 रुपये आहे. या किंमतीत तुम्हाला 16GB RAM + 256GB स्टोरेज मिळेल. हँडसेट जेड ग्रीन आणि मूनस्टोन ब्लॅक रंगात येतो. तुम्ही Amazon आणि OnePlus.in वरून स्मार्टफोन खरेदी करू शकता. तुम्हाला ICICI बँक आणि SBI कार्डवर 5000 रुपयांची झटपट सूट देखील मिळेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com