OnePlus Nord CE 3 5G
OnePlus Nord CE 3 5GTeam Lokshahi

OnePlus कंपनी घेऊन आलीयं बजेटमधील स्मार्टफोन

OnePlus कंपनी आता आपल्याला आपल्या बजेटमधील स्मार्टफोन Nord CE 3 5G लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

OnePlus ब्रँडकडून आपल्याला अत्यंत चांगली उत्पादने पुरवली जातात. तसेच OnePlus कंपनी आता आपल्या बजेटमधील स्मार्टफोन Nord CE 3 5G लॉन्च करण्याची तयारी करत आहे. बजेटमधील स्मार्टफोनच्या लाँचिंगच्या आधीच या स्मार्टफोनमधील फीचर्स समोर आले आहेत. जर तुम्हालाही OnePlus स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही हा चांगला पर्याय निवडू शकता.

OnePlus कंपनीकडून या स्मार्टफोनला 6.7-इंचाचा फुल HD + IPS LCD डिस्प्ले असणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, या स्मार्टफोनमध्ये दोन स्टोरेज पर्याय देण्यात येऊ शकते. तसेच, या स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा आहे. OnePlus कंपनीने Nord CE 3 5G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात येऊ शकते. तसेच अनेक फिचर्स या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.

OnePlus Nord CE 3 5G
'हा' सर्वात स्वस्त स्मार्टफोन करण्यात आला लॉन्च; वाचा सविस्तर

OnePlus Nord CE 3 5G च्या किंमतीमध्ये बदल करण्यात येऊ शकतो. OnePlus कंपनी हा फोन 20,000 रुपये किंवा यापेक्षा कमी किमतीमध्येही देऊ शकते. तसेच OnePlus कंपनी हा स्मार्टफोन या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरूवातीला लॉन्च करण्याची शक्यता वर्तवण्यास आली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com