Amravati|आंदोलनात सहभागी होत यशोमती ठाकूर म्हणाल्या...

भिडेंविरोधात अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रसचं आंदोलन
Published by  :
Team Lokshahi

अमरावती: संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. भिडेंच्या वक्तव्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट दिसून येत आहे. अमरावती येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केलं असून संभाजी भिडे यांना अटक करा, अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजीही केली.

महात्मा गांधी यांच्यावरील विधानाने काँग्रेससह सामान्यांमध्येही तीव्र असंतोष उफाळला असून राज्यभरातून आंदोलनाद्वारे त्यांच्या अटकेची मागणी जोर धरत आहे. यात आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले. यावेळी भिडेंना अटक करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी उचलून धरली. अटक न झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com