Ujjani Dam : उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; चंद्रभागेच्या वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली
थोडक्यात
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस
उजनीतून भीमा नदीत 95 हजार क्युसेकने विसर्ग
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
( Ujjani Dam ) महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात ढगाळ वातावरण कायम असलेले पाहायला मिळत असून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. जोरदार पावसामुळे पंढरपूरला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 95 हजार क्युसेक पाणी सोडले आहे. त्यामुळे भीमा नदी दुधडी भरून वाहत आहे.
चंद्रभागा नदीच्या वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली असून तालुक्यातील बंधारे देखील पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.