Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : 'या' तारखेपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

मराठवाड्याला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • राज्यात शुक्रवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार

  • राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीची शक्यता

  • मराठवाड्याला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

( Maharashtra Weather Update) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस कोसळतोय. हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात ढगाळ वातावरण असून ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धाराशिव, लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात पावासाचा हाहा:कार पाहायला मिळतो आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे असून घराघरात पुराचे पाणी शिरले आहे. बीडमध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता राज्यात पावसाचा जोर शुक्रवारपासून पुन्हा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Maharashtra Weather Update
Solapur Heavy Rain : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी जाहीर

अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून काही भागात कमी पाऊस पडेल. ईशान्य बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कालावधीत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून कोकण तसेच घाटमाथ्यावरही पावसाचे प्रमाण जास्त आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, लातूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहिल्यानगर, नाशिक या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com