मेष (Aries Horoscope)
आज आपणास उर्जात्मक आणि सकारात्मक दिनमान राहील. प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे आपल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी व्हाल.
वृषभ (Taurus Horoscope)
आज रोजगारात समाधानकारक स्थिती राहील. काहींना पगारवाढ व बदलीची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल. मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे.
मिथुन (Gemini Horoscope)
आज मनोबल व आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळेल. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. आपल्या कार्यक्षेत्रात क्षेत्रात मान सन्मान मिळेल.
कर्क (Cancer Horoscope)
आज चंद्रबल पीडादायक असणार आहे. नोकरी रोजगारात फार मोठा धोका पत्करणे योग्य ठरणार नाही. मनावर संयम ठेवा. फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका.
सिंह (Leo Horoscope)
आज रोजगारात एखादी महत्वाची पण विलंबाने झालेली कृती फायदयाची जाणवेल. काही नवीन आलेले प्रस्तावाचे स्वागत केले जाईल. योजलेली काम वेळेत पूर्ण होतील.
कन्या (Virgo Horoscope)
आज विचारअंतीच निर्णय घ्यावेत. रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील. आपल्यावर आरोप होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील.
तूळ (Libra Horoscope)
आज आपल्या कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. व्यापारात काहींना अचानक धनलाभाच्या संधी मालामाल करतील.
वृश्चिक (Scorpio Horoscope)
आज आपणास मनोइच्छित यश आणि फळ मिळणार आहे. घर नविन वस्तु खरेदी करण्याचा योग आहे. व्यापारी वर्गाला आपले व्यापार कौशल्य सिद्ध करता येईल.
धनु (Sagittarius Horoscope)
आज रोजगारात कामाच्या पद्धतीत बदल कराल. नवनवीन प्रयोग आमलात आणाल. समाजात मानसन्मान वाढेल. नोकरीत विशेष संधी उपलब्ध होईल.
मकर (Capricorn Horoscope)
आज उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिनमान असेल. कुटुंबात वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. व्यवसायातील योजना गुप्त ठेवा. काही विशेष कामा निमित्त आपणास
कुंभ (Aquarius Horoscope)
आज मनोबल ठिक राहणार नाही. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. वादविवादामुळे आपले मानसिक स्वास्थ बिघडेल. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा.
मीन (Pisces Horoscope)
आज नियोजित कार्य पूर्ण होणार आहेत. सहकारी वर्गाकडून कामात मदत मिळेल. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत मोठे लाभ होतील.