देश-विदेश

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याबाबत NIA चा अहवाल: पाकिस्तानचा थेट सहभाग उघड

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि पाकिस्तान आर्मीचा या हल्ल्यात थेट सहभाग असल्याचे समोर आले आहे.

Published by : Shamal Sawant

जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याला काही दिवस उलटून गेले आहेत. या हल्ल्यामध्ये हिंदू निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक कठोर पावलं उचलली आहेत. या हल्ल्यामागे पाकिस्तान असून तेथे आश्रयास असलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि पाकिस्तान आर्मीचा या हल्ल्यात थेट सहभाग असल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तान यंत्रणांनी ठरवून रचलेला कट असल्याचे समोर आले आहे. हल्ला झाल्यापासून एनआयएची टीम पहलगाम तपासाला लागली होती. यादरम्यान टीमने 20 स्थानिक नागरिकांची एनआयएने चौकशी सुरु केली. समोर आलेल्या माहितीनुसार, हाशमी मुसा उर्फ सुलेमान आणि भाई उर्फ तल्हा भाई हे या हल्ल्याचे मुख्य हँडलर होते. हे दोघेही पाकिस्तानी नागरिक असून ते दोघंही दहशतवाद्यांच्या संपर्कात होते. हे दोघंही हल्ल्याची वेळ, साधने आणि योजना यासंबंधी सूचना देत होते. हे दोघंही हल्ल्याच्या एक आठवडा आधी म्हणजेच 15 एप्रिल रोजी भारतात घुसले होते.

कोणत्या ठिकाणी केली रेकी ?

दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये बैसरन, आरू व्हॅली, बेटाब व्हॅली आणि एक मनोरंजन पार्क अशा चार ठिकाणांची रेकी केली होती. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था कमी असल्यामुळे बैसरनची निवड करण्यात आली. एएनआयच्या तपासात घटनास्थळी 40 पेक्षा अधिक काडतुसे सापडली. तसेच 3 डी मॅपिंग आणि मोबाइल टॉवर डेटाचादेखील अभ्यास केला गेला आहे.

सॅटेलाइट फोनही कार्यरत :

सॅटेलाइट फोन सिग्नल्समध्ये अचानक वाढ झाल्याचेदेखील तपासात आढळून आले. बैसरन व्हॅलीमध्ये 3 सॅटेलाइट फोन सुरु होते. आतापर्यंतच्या तपासात 2800 पेक्षा अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच 150 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्हीदेखील तपासण्यात आले आहेत. यामध्ये दहशतवाद्यांच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ