TURKEY DELIVERS MILGEM-CLASS WARSHIP PNS KHYBER TO PAKISTAN NAVY, ENHANCING MARITIME POWER 
देश-विदेश

India Pakistan: भारताविरोधात पाकिस्तानच्या समुद्री ताकदीत वाढ; तुर्कीची ‘पीएनएस खैबर’ युद्धनौका पाक नेव्हीत दाखल

Turkey Pakistan: तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानने अत्याधुनिक मिल्गेम क्लास युद्धनौका पीएनएस खैबर नौदलात दाखल केली आहे.

Published by : Dhanshree Shintre

भारताविरोधात आपली लष्करी ताकद वाढवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानला तुर्कीने आणखी एक अत्याधुनिक नौदल अस्त्र दिलं आहे. पाकिस्तानी नौदलाने आपली दुसरी मिल्गेम क्लास युद्धनौका पीएनएस खैबर अधिकृतपणे सेवेत दाखल केली असून, ही युद्धनौका तुर्कीच्या इस्तांबुल येथील नेवल शिपयार्डमध्ये बांधण्यात आली आहे. या कमीशनिंग कार्यक्रमाला तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप एर्दोगन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर पाकिस्तानी नौदलाचे प्रमुख एडमिरल नवेद अशरफही यावेळी उपस्थित होते.

याआधी ऑपरेशन सिंदूरच्या काळात पाकिस्तानने तुर्कीने पुरवलेले ड्रोन भारताविरोधात वापरले होते. मात्र भारताच्या अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिमने हे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केले होते. आता समुद्रातील सामरिक ताकद वाढवण्यासाठी पाकिस्तानने तुर्कीच्या मदतीने पीएनएस खैबर नौदलात दाखल केली आहे.

कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रपती एर्दोगन यांनी तुर्की–पाकिस्तानमधील ऐतिहासिक बंधुत्वावर भर दिला. संरक्षण उत्पादन आणि लष्करी सहकार्याच्या क्षेत्रात भविष्यात अधिक सहकार्य वाढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रादेशिक समुद्री सुरक्षेबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली.

पीएनएस खैबरच्या कमीशनिंगनंतर राष्ट्रपती एर्दोगन यांनी युद्धनौकेचा दौरा केला. जहाजावरील क्रू सदस्यांशी संवाद साधत त्यांनी पाकिस्तान नेवी आणि तुर्की नेवल फोर्सेसमधील संयुक्त प्रयत्न अधिक बळकट करण्यावर भर दिला.

2018 मध्ये पाकिस्तानच्या संरक्षण उत्पादन मंत्रालय आणि तुर्कीच्या एम/एस अस्फात कंपनीमध्ये चार मिल्गेम क्लास युद्धनौकांच्या निर्मितीचा करार झाला होता. याआधी पीएनएस बाबर नौदलात दाखल झाली असून उर्वरित पीएनएस बेदर आणि पीएनएस तारिक या 2026 आणि 2027 पर्यंत सेवेत येणार आहेत.

पीएन मिल्गेम क्लास ही बहुउद्देशीय कोर्वेट असून ती अँटी-सबमरीन वॉरफेअर, एअर डिफेन्स आणि सर्फेस वॉरफेअरमध्ये सक्षम आहे. आधुनिक शस्त्रसज्जतेमुळे पाकिस्तानच्या नौदल क्षमतेत मोठी भर पडली असून याचा परिणाम प्रादेशिक सामरिक समीकरणांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा