PETROL CHEAPER THAN CHOCOLATE: VENEZUELA OFFERS FUEL AT ₹1 PER LITRE AMID GLOBAL TURMOIL 
देश-विदेश

Petrol Price: ग्राहकांसाठी मोठी खुशखबर! चॉकलेटपेक्षा स्वस्त पेट्रोल; 1 रुपयात 1 लिटर, 50 रुपयांत टाकी फुल्ल

Cheapest Petrol: जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएलात मिळते. फक्त १ रुपयात लिटर पेट्रोल आणि ५० रुपयांत टाकी फुल्ल होऊ शकते.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यूयॉर्क न्यायालयात हजर करण्यात आले. या घटनेमुळे जगभर खळबळ उडाली आहे. व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिकेतील इंधनाचा सर्वात समृद्ध देश म्हणून ओळखला जातो. खनिज तेलाच्या प्रचंड साठ्यावर ताबा मिळवण्यासाठीच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर व्हेनेझुएलातील इंधन व्यवस्थेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१ रुपयात लिटर पेट्रोल; चॉकलेटच्या किंमतीत टाकी फुल्ल

भारतात एका लिटर पेट्रोलसाठी १०० रुपयांपर्यंत मोजावे लागतात, पण व्हेनेझुएलात हेच इंधन अवघ्या १ ते ३ रुपयांना मिळते. एका चॉकलेटच्या किंमतीत लिटर पेट्रोल मिळते. जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल असलेल्या या देशात ३५ ते ५० लिटर क्षमतेची टाकी केवळ ५० ते १५० रुपयांत भरता येते. बाईकची टाकी फुल्ल करण्यासाठी केवळ ५० रुपये पुरतात. व्हेनेझुएलात पेट्रोलची किंमत ०.०१ ते ०.०३५ डॉलर प्रति लिटर आहे, जी भारतीय चलनात १ ते ३ रुपये इतकी येते.

दुहेरी इंधन प्रणाली; सबसिडी आणि प्रीमियम पर्याय

व्हेनेझुएलातील इंधन विक्रीची व्यवस्था दुहेरी आहे. सर्वसामान्यांसाठी सबसिडीचे पेट्रोल असून, प्रीमियम पेट्रोल आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दरानुसार विकले जाते. यावर सरकार सबसिडी देत नाही. तरीही प्रीमियम पेट्रोलची किंमत सुमारे ४२ रुपये प्रति लिटर आहे, जी भारतापेक्षा खूपच स्वस्त आहे. ५० लिटर टाकी फुल्ल करण्यासाठी २० ते २५ डॉलर (१७०० ते २१०० रुपये) लागतात. ही व्यवस्था देशातील प्रचंड तेल साठ्यामुळे शक्य झाली आहे.

तेल साठ्याच्या बाबतीत जगातील अव्वल देश

अल जझिरानुसार, २०२३ पर्यंत व्हेनेझुएलाकडे ३०३ अब्ज बॅरल तेल साठा होता, जो जगातील सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर सौदी अरब असून, त्यांच्याकडे २६७.२ अब्ज बॅरल साठे आहेत. तिसऱ्या स्थानावर इराण (२०८.६ अब्ज बॅरल) आणि चौथ्या क्रमांकावर कॅनडा (१६३.६ अब्ज बॅरल) आहे. मादुरो अटकेमुळे या तेलसमृद्ध देशाच्या भविष्याकडे जगाचे डोळे लागले आहेत.

  • व्हेनेझुएलात पेट्रोल फक्त १ ते ३ रुपयांत प्रति लिटर.

  • ५० रुपयांत बाईकची टाकी फुल्ल होऊ शकते.

  • देशात सबसिडी आणि प्रीमियम अशी दुहेरी इंधन व्यवस्था.

  • ३०३ अब्ज बॅरल तेल साठ्यामुळे व्हेनेझुएला जगातील सर्वात तेलसमृद्ध देश.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा