(PM Modi Maldives Visit :) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दोन दिवसांच्या मालदीव दौर्यात तब्बल ५६५ दशलक्ष डॉलर्स कर्ज देण्याची घोषणा केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. हा दौरा मुख्यत्वे विकास सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी असून, चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भारत मालदीवसोबत आपले संबंध मजबूत करत आहे. मोदी यांनी स्पष्ट केले की, जाहीर केलेली रक्कम मालदीवमध्ये पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी वापरली जाईल. पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि मालदीवमध्ये मुक्त व्यापार करारावरही चर्चा केली
“ही मदत मालदीवच्या जनतेच्या गरजा लक्षात घेऊन वापरली जाईल आणि दोन्ही देश लवकरच एक गुंतवणूक करार अंतिम करतील. भारत मालदीवसाठी सदैव पहिला प्रतिसाद देणारा देश राहील. भारताने मालदीवच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी मदत केली आणि त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध पुन्हा सुधारले. नंतर मुइझू यांनी भारतभेट घेतली.
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी सांगितले की, भारताकडून मिळालेली आर्थिक मदत संरक्षण, आरोग्य, शिक्षण व गृहनिर्माण क्षेत्रात उपयुक्त ठरेल. त्यांनी भारताच्या वस्तू निर्यातीच्या सातत्यपूर्ण सहकार्याचीही प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी हे मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभागी होत आहेत. तसेच, भारताच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या हनिमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तार प्रकल्पाचे ते उद्घाटन करणार आहेत.