Vladimir Putin 
देश-विदेश

Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा भारत दौरा आजपासून सुरू होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Vladimir Putin) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा भारत दौरा आजपासून सुरू होत आहे. 4 आणि 5 डिसेंबरला पुतिन यांचा दोन दिवस भारत दौरा असणार असून दोन दिवसांच्या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन पंतप्रधान मोदींशी चर्चा करतील.

तसेच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करतील असे परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार समजते. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादलेले असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

या दौऱ्याच्याआधी रशियाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने, स्टेट ड्यूमाने मंगळवारी भारतासोबतच्या लष्करी कराराला औपचारिक मान्यता दिली. या कराराला रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स सपोर्ट (RELOS) म्हणतात. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्यात या हालचालीकडे एक मोठे बदल म्हणून पाहिले जात आहे.

Summery

  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर

  • 4 आणि 5 डिसेंबरला पुतिन यांचा दोन दिवस भारत दौरा

  • भारतावर टॅरिफ लादलेले असताना पुतिन यांचा दौरा महत्त्वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा