चीननं डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेवर 145 टक्के आयात कर लागू केल्यानंतर त्यावर अमेरिकेकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील या टॅरिफ वॉरमुळे दोन्ही देशांमध्ये मिळणाऱ्या वस्तू दिवसेंदिवस महाग होऊ लागल्याचं दिसत आहे.
दरम्यान, या परिस्थितीचं खापर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने चीनवर फोडलं आहे. दुसरीकडे चीनकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. “शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही उत्तर देत राहू”, असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्पष्ट केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर 68 टक्के असणारा आयात कर चीननं आता थेट 125 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.