Aamir Khan Team Lokshahi
मनोरंजन

Aamir Khan : चाहत्यांसाठी खुशखबर; आमिरच्या हाती नवे प्रोजेक्ट्स...

सध्या आमिर एकाहुन अधिक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.

Published by : prashantpawar1

मिस्टर परफेकशनिस्ट म्हणून नामांकित असणारा आमिर खान (Aamir Khan) हा बॉलिवूडमधील असा एक अभिनेता आहे ज्यास एकावेळी एकच चित्रपट करायला आवडतो. पण यावेळी तो एकाहुन अधिक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. त्याचा शेवटचा चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' प्रदर्शित होऊन बराच कालावधी झाला आहे. अशा स्थितीत यावेळी एकापाठोपाठ एक अनेक चित्रपट देऊन आमिर पडद्यावर पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. तसे 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' नंतर त्याचा आगामी चित्रपट 'लाल सिंग चड्ढा' प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आमिरच्या हाती अनेक चित्रपटासाठी स्क्रिप्ट आहेत. सध्या आमिर सिद्धार्थ पी मल्होत्रा (Sidharth P Malhotra)सोबत एका फिचर फिल्मसाठी चर्चित असल्याचे वृत्त आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ सध्या यशराज प्रॉडक्शनच्या 'महाराजा' चित्रपटात आमिरचा मुलगा जुनैदचे दिग्दर्शन करत आहे. या प्रक्रियेत चित्रपटासाठी सिद्धार्थच्या अनेक कल्पनांबाबत आमिरसोबत वारंवार भेटीगाठी होत आहेत. आमिरला त्यापैकी एक आवडला आहे आणि त्याने सिद्धार्थला त्याच्या लेखकांच्या टीमसह कथानकावर काम करण्यास सांगितले आहे.

सिद्धार्थच्या चित्रपटाव्यतिरिक्त आमिर एका स्पॅनिश चित्रपटामध्ये देखील काम करत आहे. त्यासाठी जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आमिर 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. त्यानंतरच त्याची अधिकृत घोषणा होईल. याचे दिग्दर्शन 'शुभ मंगल ज्यादा सावधान' फेम आरएस प्रसन्ना करणार आहेत.

या दोन चित्रपटांशिवाय आमिर आणखीही अनेक प्रोजेक्ट्सवर चर्चित आहे. यामध्ये एका वादग्रस्त वकिलाच्या बायोपिकचा समावेश आहे. 'मोगल इन द किटी' हा चित्रपट आहे जो त्याला ऑफर करण्यात आला आहे. एकूणच आमिर सध्या एकामागून एक अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. त्याच्या हाती चार स्क्रिप्ट आहेत. सध्या तो 11 ऑगस्टला रिलीज होणाऱ्या 'लाल सिंह चड्ढा' या आगामी चित्रपटाकरिता उत्सुक आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा