Aamir & Kareena Team Lokshahi
मनोरंजन

Aamir Khan : लालसिंग चड्डा रिलीज होणार OTT वर?

चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे.

Published by : prashantpawar1

आमिर खान (Aamir Khan) यांच्या 'लालशिंग चड्डा' या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच्या प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळ पहायला मिळतं. ज्यामुळे तो इतर कलाकारांपेक्षा वेगळा कलाकार ठरतो. आमिर बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. त्याचा शेवटचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटात तो दिसला होता. 2018 साली रिलीज झालेला हा चित्रपट सुपर फ्लॉप ठरला. आमिर सध्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटातून पुनरागमन करणार असून आमिर हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक घेऊन येत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर (Kareena Kapoor) ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत असून आमिरच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. त्याचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे.

लाल सिंग चड्ढाचा ट्रेलर आमिरने आयपीएल 2022च्या अंतिम फेरीत रिलीज केला होता. हा हॉलिवूड 1994 चा Forest Gump चा हिंदी रिमेक आहे. 1994 मध्ये आलेला चित्रपट आमिर खानने आपल्या खास शैलीत सादर केला आहे. 11ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रिलीज झाल्यानंतर आता लाल सिंग चड्ढा OTT प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित होणार असल्याची पुष्टी झाली आहे. बॉलीवूड लाईफच्या रिपोर्टनुसार लाल सिंग चड्ढा ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 8-9 आठवड्यांनंतर प्रदर्शित होईल.

अद्याप तारीख निश्चित केलेली नसली तरी. रिपोर्ट्सनुसार 'लाल सिंह चड्ढा' नियोजित वेळेपूर्वी ओटीटीवर रिलीज होणार नाही. लाल सिंह चड्ढा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. आमिर आणि करीनासोबत मोना सिंग व लाल सिंग या दोन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर अद्वैतने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?