Shailesh Lodha Team Lokshahi
मनोरंजन

‘तारक मेहता' पुन्हा एका खास कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

शैलेश लोढा यांच्या नवीन शोचा प्रोमो आला समोर

Published by : shamal ghanekar

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. या शोमध्ये ‘तारक मेहता’ची भूमिका साकारणारे आणि जेठालाल यांचे प्रियमित्र अभिनेता शैलेश लोढा (Shailesh Lodha) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. सुत्राकडून मिळालेल्या माहितीवरून शैलेशने या शोला अलविदा म्हटले जात आहे. शैलेश यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’शो सोडल्याचे समजता त्यांचे चाहते दु:खी झाले आहेत. पण मात्र, या चर्चेवर शोचे निर्माते आणि शैलेश लोढा यांचे कोणतेही वक्तव्य अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे शैलेश ही मालिका सोडणार असल्याचे अजूनही अस्पष्ट आहे. तसेच आता शैलेश लोढा यांच्या नवीन शोचा प्रोमो समोर आला असल्याने तर्क लावले जात आहेत.

‘तारक मेहता...’ फेम शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चा सुरु असतानाच शैलेश लोढा यांच्या नव्या शोचा प्रोमो (Promo) समोर आला आहे. शैलेश लोढा हा शो होस्ट करणार असून या शोचे नाव ‘वाह भाई वाह’ (Wah Bhai Wah) असे आहे. या शोचा प्रोमो ‘शेमारू टीव्ही’ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेल्या प्रोमोला सुंदर असे कॅप्शनही त्यांनी दिले आहे. कॅप्शन असे आहे की, ‘वाह भाई! तुम्हाला माहिती असेलच, हा कोण आहे, जो नवीन शो घेऊन येत आहे?’शेअर केलेल्या प्रोमोमध्ये शैलेश लोढा यांचा चेहरा दिसत आहे. अद्याप फारशी या शोबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही.

तसेच काही दिवस झाले ‘तारक मेहता...’ म्हणजेच या मालिकेमधील शैलेश लोढा दिसत नाही आहेत. त्यामुळे आता ते ही मालिका सोडणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर आता निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumarr Modi) यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की या सर्व अफवा आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा अस्वस्थ करणाऱ्या आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील सर्वच पात्र साकारणारे कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीने आणि अभिनयाने प्रंचड चर्चेत असतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा