प्रसिद्ध कलाकार वैभव मांगले यांनी नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. त्यामध्ये वैभव मांगले यांनी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमधील आलेल्या अनुभवाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरून रसिक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाट्यगृहातील दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर वैभव मांगले यांनी केलेली पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. वैभव मांगले यांनी पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, पुणे , छ.संभाजीनगर , नाशिक येथे प्रयोग झाले संज्या छायाचे . एका हि ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती . रंग मंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला . प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात( विशेषतः बालगंधर्व पुणे खूप डास आणि उकाडा , कोथरूड यशवंतराव .. उकाडा ) ) प्रयोग पहात होते . एक मर्यादे नंतर नाशिक मध्ये रसिकांचा राग ,हतबलता अनावर झाली त्यांनी गोंधळ केला . तिकिटाचे पैसे परत घ्यावे का याचा विचार करू लागले . पण आपण show must go ȏṅ वाले लोक.
आम्ही विनंती केली की आम्हाला ही त्रास होतोच आहे .. इथे येई पर्यंत माहित नव्हतं कि कि ac नाहीयेय . आमच्या निर्माते दिलीप जाधव यांनी 17 आणि 27 चे शो रद्द केले .त्या हवे चे आवागमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला . कालिदास ला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता . या सगळ्यात सगळ्यांची होलपट होतेय . कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी ??? विचारलं तर सांगतात ac चालू आहे पण खूप गर्मी असल्याने ac यंत्रणा नीट काम करत नाही . पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही . काय बोलावं या सगळ्यावर वर .???????? असे वैभव मांगले म्हणाले आहेत.