Akshay Kumar Team Lokshahi
मनोरंजन

Akshay Kumar : अक्षय देतोय तिनही खानला टक्कर ?

अक्षय कुमार एकटाच तिन्ही खान यांना मागे टाकत प्रसिद्धीच्या बाबतीत पुढे सरसावला आहे.

Published by : prashantpawar1

बॉलीवूडमध्ये खान फॅक्टरने नेहमीच आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे. मात्र यावेळी अक्षय कुमार एकटाच तिन्ही खान यांना मागे टाकत प्रसिद्धीच्या बाबतीत पुढे सरसावला आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) हा एकमेव बॉलिवूड सुपरस्टार आहे ज्याचे दरवर्षी 3-4 चित्रपट प्रदर्शित होतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे देशात लॉकडाऊन होता आणि या लॉकडाऊननंतर जेव्हा पहिल्यांदा सिनेमा हॉल सुरू झाला तेव्हा अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अपेक्षेहुन कमी पण प्रेक्षक मोठ्या कालावधीनंतर खुल्या चित्रपटगृहात आणण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला.

2022 मध्येही अक्षय कुमारचे दोन सिनेमे रिलीज झाले असून त्यात 'बच्चन पांडे' आणि 'सम्राट पृथ्वीराज' यांचा समावेश आहे. मात्र खिलाडी कुमारचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकले नाहीत. याच कारणामुळे अक्षय कुमारने मे महिन्याच्या Ormax मीडियाच्या सर्वाधिक लोकप्रिय पुरुष स्टार्स (हिंदी) यादीत शीर्षस्थानी स्थान मिळवले आहे.

अक्षय कुमारने लोकप्रियतेच्या चार्टवर आपले नाणे जमा केले. शाहरुख खान (Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan), आमिर खान (Aamir Khan) आणि हृतिक रोशन (Hritik Roshan) यांना मागे टाकत अक्षयने या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. एवढच नव्हे तर अक्षय कुमार येत्या काही महिन्यांपर्यंत या यादीत टॉपवर राहू शकतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा