Akshay Kumar Team Lokshahi
मनोरंजन

अक्षय कुमार 'या' सिनेमात साकारणार विमान कंपनीच्या मालकाची भूमिका

अक्षय कुमार आणि राधिका मदन 'या' सिनेमात करणार एकत्र काम

Published by : Team Lokshahi

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) ने 'बच्चन पांडे' या चित्रपटानंतर आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय पहिल्यांदाच राधिका मदन (Radhika Madan)सोबत काम करताना दिसणार आहे. हा चित्रपट साऊथच्या सिनेमाचा हिंदी रीमेक असणार आहे.

अक्षयने त्याच्या सोशल मीडिया (social media) अकाऊंटवर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करतांनाच्या वेळचा पूजेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओला शेअर करताना अक्षयने चित्रपटासाठी नाव सूचवण्याचं आवाहन चाहत्यांना केले आहे. अक्षयचा हा चित्रपट एअर डेक्कन (Air Deccan) या भारतातील अत्यंत स्वस्त विमान कंपनीचे मालक जी.आर. गोपीनाथ यांची यशोगाथा मांडणारा आहे.

अक्षयचा हा नवीन चित्रपट तामिळ चित्रपटाचा रिमेक असून 'सोरारई पोट्टू' असं या चित्रपटाच नाव आहे. या तामिळ चित्रपटात स्टार सूर्यानं महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली होती.

अक्षयच्या या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा (Sudha Kongara) करीत आहेत. ज्यांनी तामिळ चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले होते. सुरुवातील अक्षय या सिनेमात काम करत नाही असं बोललं जात होतं,पण आता त्यानं स्वतःच सिनेमाच्या शूटिंग सेटवरचा व्हिडीओ शेअर केल्यामुळे तोच या सिनेमात काम करीत आहे, यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. या चित्रपटात राधिका मदन अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका करीत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा