Saisha Shinde Team Lokshahi
मनोरंजन

साईशावर वाईट वेळ, डिझायनरनं रुमवर बोलवून...

सायशाचे नाव 'लॉक अप' या रिअँलिटी शोमुळे चर्चेत आले आहे.

Published by : Akash Kukade

भारतीय फॅशन डिझायनिंग विश्वामध्ये साईशा शिंदे (Saisha Shinde) हे नाव काही नवीन नाही. सध्या सायशाचे नाव 'लॉक अप' (Lock up) या रिअँलिटी शोमुळे चर्चेत आले आहे. बाद फेरीपासून वाचण्यासाठी शोच्या रुपरेषेप्रमाणेच सेलिब्रिटींनी त्यांच्या आयुष्यातील काही गुपितं उघड करणं अपेक्षित असतं. अशीच गुपितं यावेळी अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) आणि साईशा शिंदे यांनी सर्वांसमोर आणली.

साईशाच्या जीवनातील अनेक कठीण प्रसंगांबद्दल आतापर्यंत प्रेक्षकांनी पाहिलं- ऐकलं. आता यातच आणखी एक मोठा उलगडा सायशाने केला आहे. याविषयी सांगताना मात्र तिलाही संकोच वाटत होता.

काय म्हणाली साईशा?

आजपर्यंत हे गुपित मी कधीच बाहेर आणलेलं नाही. परंतु, हे जाणून तुम्हालाही धक्का बसेल. एक लोकप्रिय भारतीय डिझायनर (Designer) आहेत. तसे तर ते माझेही आवडीचे डिझायनर होते. त्यांना मी भेटले तेव्हा भारावले होते. मला त्यांनी हॉटेल रुमवर बोलवलं आणि आमच्यात शारीरिक जवळीक निर्माण झाली. यानंतर मला माहिती झाले की, त्यांनी 7-8 मुलांसोबतही असेच कृत्य केले होते, असे सायशाने सांगितले.

साईशानं केलेला हा गौप्यस्फोट ऐकल्यानंतर तिथे असणाऱ्या कलाकार स्पर्धकांना जबर धक्का बसला. इतकंच नव्हे, तर तिच्यासोबत असं करणारा तो डिझायनर कोण? हा प्रश्नही सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा